रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
रावेर- शिवजयंती चे औचित्य साधत आज संभाजी ब्रिगेड तर्फे रावेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. सुरुवातीला जिजाऊ नगर मध्ये आणि रावेर खरेदी-विक्री शेतकी संघात छत्रपती शिवाजी महाराजांचे मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन, अभिवादन करण्यात आले. [ads id="ads2"]
त्यानंतर रावेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले गेले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, रावेर तालुका अध्यक्ष विनोद चौधरी, संभाजी ब्रिगेड, रावेर तर्फे शिवजयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळीशहर अध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे, कार्याध्यक्ष योगेश महाजन, मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील, रावेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील, घनश्याम पाटील, पं.स. सदस्य योगेश पाटील तेजस पाटील, दीपक पाटील, नारायण लोणारी आदी उपस्थित होते.

