Bhusawal : पोलीस उपनिरीक्षकाला मारहाणप्रकरणी फरार आरोपीला केली अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 
तब्बल ८० दिवस होता फरार; घरी जाऊन घेतले ताब्यात

भुसावळ : पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी निखिल राजपूत या फरार  आरोपीस तब्बल ८० दिवसानंतर  सोमवारी पकडले. यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

शहरातील श्रीरामनगरजवळील हनुमान मंदिराजवळ २७ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना एका संशयिताला हटकल्यानंतर रेकॉर्डवरील कुख्यात निखिल राजपूत याच्यासह टोळक्याने बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकालाच ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना घडली होती.[ads id="ads2"] 

याप्रकरणी निखिल राजपूतसह ८ जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र संशयित पसार झाले होते.

संशयिताला पोलीस त्यांच्या शोधात होते. निखिल राजपूत हा श्रीरामनगरातील निवासस्थानी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर ८० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १४ रोजी सकाळी पोलिसांनी घरी जाऊन त्यास ताब्यात करेंगे, असे सांगत संघटित टोळीच्या घेतले. यानंतर बाजारपेठ पोलीस माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ठाण्यात आणले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश घायतड हे रात्र गस्तीवर असताना श्रीरामनगरातील हनुमान मंदिराजवळ दोन विनाक्रमांकाच्या दुचाकीसह एक पांढऱ्या रंगाची चारचाकी दिसल्याने त्यांनी उभ्या असलेल्या संशयिताला नाव विचारले असता, त्याने नीलेश ठाकूर नाव असल्याचे सांगितले.

हे आहेत आरोपी

या गंभीर घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल आरोपी निखिल उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!