रावेर तालुक्यातील बोहर्डे येथे दोन गटात हाणामारी ; १३ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुक्यातील बोहर्डे (Boharde)  येथे दोन गटात मारहाण प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police)  परस्परविरोधी १३ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

 सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण भागवत वानखेडे, ( रा. बोहर्डे ता. रावेर) हा जवळील किराणा दुकानावर बसला असता आरोपी नामदेव कृष्णा वानखेडे हा तेथे येऊन तुझी नजर लय टाईट झालीयं... दोन दिवसात तुझे डोळे काढून टाकीन अशी धमकी दिली. सदरची हकीकत प्रवीण याने त्याच्या आईजवळ सांगितली असता सुनंदाबाई भागवत वानखेडे या सदर आरोपीला विचारणा करण्यासाठी गेले असता त्याने शिवीगाळ करून दमदाटी केली.[ads id="ads2"] 

दरम्यान आरोपी नामदेव कृष्णा वानखेडे याने त्याच्या भुसावळ (Bhusawal) येथील दोन्ही शालक व त्याच्या मित्रांना रिक्षाने बोलावून फिर्यादी प्रवीण भागवत वानखेडे व त्याची आई सुनंदाबाई भागवत वानखेडे यांना तोंडावर, पोटावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आरोपी नामदेव कृष्णा वानखेडे, सुनीताबाई नामदेव वानखेडे (दोन्ही रा. बोहर्डे, ता. रावेर) व सागर गाढे, सुरेश विष्णू इंगळे, संजय मार्तंड तायडे, भीमराव मधुकर जाधव, शुभम भीमराव वानखेडे (रा. भुसावळ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा :- Bhusawal : पोलीस उपनिरीक्षकाला मारहाणप्रकरणी फरार आरोपीला केली अटक 

हेही वाचा :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ मार्च, २०२२ पर्यंत आपले e- KYC प्रमाणीकरण पुर्ण करावे- जळगाव जिल्हाधिकारी 

हेही वाचा :- रावेर पंचायत समिती येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने

हेही वाचा :- यावल तालुक्यातील भालोद येथील ४५ वर्षीय इसमाची आत्महत्या

  दरम्यान, नामदेव कृष्णा वानखेडे याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याचे शालक हे त्यांच्या मित्रांसह वाघोड येथील मुंजोबाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी रिक्षाने बोहर्डे येथे आले असता त्यांनी रविवारी झालेल्या भांडणाचा मिटवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रवीण भागवत वानखेडे, भागवत आसाराम वानखेडे, सुनंदाबाई भागवत वानखेडे, शंकर दशरथ वानखेडे, शीतल प्रकाश वानखेडे (सर्व रा. बोहर्डे, ता रावेर) यांनी लाथाबुक्क्यांनी व लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. नामदेव कृष्णा वानखेडे व सुनीताबाई कृष्णा वानखेडे यांना मुका मार देऊन जखमी केले. रावेर पोलीस (Raver Police) स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे (PI Kailas Nagare) यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. अर्जुन सोनवणे तपास करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!