भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिया कोपर मास्टर अलायस कंपनी सुनसगाव बेलव्हाय रोड तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी झालेल्या अपघातात मृत झालेल्या कामगारांना तात्काळ आर्थिक मदत मिळणे बाबत तसेच संबंधित कंपनी मालकावर गुन्हा दाखल होणे बाबत निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी आज दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी पोलीस निरीक्षक भुसावळ यांना निवेदन दिले.[ads id="ads1"]
दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी दिया कोपर मास्टर लाईन कंपनी फर्नेस ऑईल टॅंकला कामगार वेल्डिंग करत असताना अचानक स्फोट होऊन गंभीर जखमी होऊन काशिनाथ सुरवाडे हतनूर यांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर व पदाधिकारी यांनी सूनसगाव येथील घटनास्थळाला भेट देऊन संबंधित कंपनी मालकावर गुन्हा दाखल करून मृतांच्या वारसांना शासनाने व कंपनी मालकाने आर्थिक मदत करावी या बाबत स्पष्ट केले होते. [ads id="ads2"]
आज 1 महिना होत आला तरी, शासनाने व कंपनी मालकाने या घटने बाबत दाखल न घेतल्याने आनंद भाऊ बाविस्कर यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. व निवेदनात म्हटले आहे की, येत्या 2 दिवसात सदर घटने वर कारवाई होणे अपेक्षित आहे अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. या प्रसंगी निवेदन देतांना संघटनेचे सोशल मीडिया प्रसिद्ध प्रमुख धनराज घेटे, मृत काशिनाथ सुरवाडे यांचे मोठे बंधू आनंद सुरवाडे, व नातेवाईक हिरामण अवसरमल, संदीप गाढे उपस्थित होते.

