सरदार जी. जी. स्पोर्ट्स क्लबतर्फे कबड्डी लीगमधील खेळाडूंचे ऑक्शन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) सरदार जी. जी. स्पोर्ट्स क्लबतर्फे प्रो कबड्डी लीग चे आयोजन कारण्यात  आले आहे. या कबड्डी लीगसाठी आपल्याच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शहरातील व्यवसायिक दुकानदार यांनी सहभाग घेऊन ऑक्शनमध्ये खेळाडूंची निवड केली.[ads id="ads1"] 

या लीग मॅचेस नियोजित वेळेनुसार होणार आहेत यात एकूण ६४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे व शाळेतील शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच व्यवसायिक दुकानदार यांनी कबड्डी खेळाडूंची बोली लावून संघ तयार केला एकूण ८ संघ तयार झाले. [ads id="ads2"] 

  या ऑक्शन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक व जेष्ठ क्रीडाशिक्षक ई. जे. महाजन हे होते तर प्रत्येक संघाचे ओनर म्हणून आपल्याला लाभले श्री एस पी पाटील, सौ मानसी पवार, युवराज माळी, संदीप सूर्यवंशी, अतुल विंचूरकर, नरेंद्र महाजन, ललित महाजन श्रीमंत योगी डी. जे. लाभले तर विश्वनाथ ठोसर, राजू लोहार, सुनील गुरव, व्ही व्ही पाटील, मोहन महाजन, जयेश बिरपन, तुषार महाजन, प्रतिक नाईक, वैभव महाजन यांनी हजर राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले व ऑक्शन साठी व होणाऱ्या लीग मॅचेस साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कबड्डी लीगचे आयोजन करण्यासाठी युवराज माळी, अजय महाजन, प्रतिक खराले, व सरदार जी जी स्पोट्र्स क्लबचे दिपक जाधव, प्रशांत चौधरी, स्वप्नील चौधरी, राम चौधरी, वैभव महाजन, रोहित महाजन तर सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब च्या सर्व खेळाडूने परिश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!