Muktainagar : वडोदा परीसरात लांडग्याचे दर्शन ; 14 बकऱ्यांचा पाडला फडशा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 वडोदा परीसरातील शेतशिवारातील घटना : पशूपालकांमध्ये पसरली घबराट


मुक्ताईनगर प्रतिनिधी (गौतम अटकाळे) : तालुक्यातील वडोदा येथे लांडग्यांने केलेल्या हल्ल्यात 14 बकऱ्यांसह बोकडाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 14 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर पशूपालकांमध्ये घबराट पसरली असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.[ads id="ads1"] 

शेतातील कळपावर चढवला हल्ला 

 शालिग्राम निनाजी बोदडे (वडोदा) यांनी आपल्या वडोदा येथील गट क्रमांक 268 शेतामध्ये बकऱ्यांचा कळप लावल्यानंतर ते जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी वडोदा (Vadhoda)  येथे गेले असता अचानक लांडग्याने हल्ला चढवल्याने 14 बकऱ्यांसह बोकडांचा मृत्यू ओढवला तर काही बकऱ्या जखमी झाल्या. [ads id="ads2"] 

  हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्याने गावातील काही ग्रामस्थांसह व शिवसेना उप तालुकाप्रमुख नवनीत पाटील यांना फोनवर माहिती दिली असता नवनीत पाटील यांनी तत्काळ वनविभागाच्या (Forest Department)  कुऱ्हा वनपाल बी.आर. मराठे व वनपाल पाचपांडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली व त्यांनी नुकसानीची माहिती जाणून घेत पंचनामा केला. 

हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यातील 'या' आमदारांची आमदारकी धोक्यात ? 

हेही वाचा :- Bhusawal : पोलीस उपनिरीक्षकाला मारहाणप्रकरणी फरार आरोपीला केली अटक 

हेही वाचा :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ मार्च, २०२२ पर्यंत आपले e- KYC प्रमाणीकरण पुर्ण करावे- जळगाव जिल्हाधिकारी 

हेही वाचा :- रावेर पंचायत समिती येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने

हेही वाचा :- यावल तालुक्यातील भालोद येथील ४५ वर्षीय इसमाची आत्महत्या

शालिग्राम निना बोदडे (Shaligram Ninaji Bodade) यांच्या शेताला तार कंपाउंड असलेतरी लांडग्याने हल्ला चढवत बकऱ्यांचा फडशा पाडला. आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी सोमवारी रात्रीच भ्रमणध्वनीवरून संपूर्ण माहिती जाणून घेत वनविभागाला पंचनामा करून भरपाई देण्याबाबत सूचना दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!