लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रावेर येथे निवेदन देवून आरोपीला कठोर शासन होण्याची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) धरणगाव येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज रावेर येथे रावेर तालुका तेली समाजातर्फे निवेदन देवून आरोपीला कठोर शासन होण्याची मागणी करण्यात आली. या वेळी समाज बांधव उपस्थित होते. [ads id="ads1"] 

     निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शक्ती या बिला अंतर्गत सदर घटनेची सखोल लवकर चौकशी होवून दोषारोप दाखल व्हावे, सरकारी वकील मार्फत खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी, पिडित मुलींना शासनाकडून शासकीय सुविधांचा लाभ मिळून त्यांच्या कुटूंबीयांना संरक्षण देण्यात यावे.[ads id="ads2"] 

     सदर आरोपी व त्याचे मुलाने अमानुष प्रकार केलेले आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही स्थानिक पातळीवर चौकशी मुलाला सह आरोपी करावे. आरोपीचा परिवार राजकिय क्षेत्रात सक्रिय आसल्याने पोलीस यंत्रणेवर दबाव आणु शकतो, असा हस्तक्षेप खपवून न घेता आरोपीला कठोर शासन होण्याची मागणी रावेर निवसी नायब तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा :- एरंडोलनजिक झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी 

हेही वाचा :- मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! महिलांची एकमुखी मागणी ; धरणगांवात शांततेत निघाला मूक मोर्चा !

हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू 

हेही वाचा :- दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात शॉक लागून एकाचा मृत्यू 

     निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग अध्यक्षा, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. 

     निवेदन देतू वेळी अँड सुरज चौधरी, चंद्रकात चौधरी, भूषण महाजन, अनिल चौधरी, सुभाष चौधरी, दिनेश चौधरी, पंकज चौधरी, सुभाष चौधरी, रविंद्र चौधरी, अँड भगवान चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, दिपक चौधरी, विनोद चौधरी, संतोष चौधरी, सुनील चौधरी, अरूण चौधरी, संजय चौधरी, किरण चौधरी, गणेश चौधरी, जिवन चौधरी, पररेश चौधरी, प्रफुल्ल कासार यांच्यासह तेली समाज बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!