दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात शॉक लागून एकाचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 काम करत असतानाची घटना, अन्य एक जखमी

भुसावळ : औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर मधील ५०० मेगावॅट प्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे २३ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान शक्तिगड येथील मेजर स्टोअर परिसरात असलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारांना स्पर्श होऊन कर्मचारी सोपान लोटू बोरणारे (४२) राहणार पिंपरी सेकम यांचा जागीच मृत्यू झाला व राहुल भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.[ads id="ads1"] 

संबंधित कर्मचारी मिलिंद धर्माधिकारी ठेकेदार यांच्याकडे कामाला होते. कर्मचारी सोपान बोरणारे व राहुल भोई हे ६६० प्रकल्पाचे साहित्य ठेवण्यासाठी स्टोअर रूम तयार करत असताना तेथे शिडी नेत असताना विजेच्या ३३ हजार केव्ही उच्च दाबाच्या ताराला शिडीचा स्पर्श होऊन सोपान बोरणारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल भोई है गंभीर जखमी झाले आहेत.[ads id="ads2"] 

या घटनेची खबर परिसरात कळताच जखमी कर्मचाऱ्यांना भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सोपान बोरणारे यांना मृत घोषित केले.


  हेही वाचा :- एरंडोलनजिक झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी 

हेही वाचा :- मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! महिलांची एकमुखी मागणी ; धरणगांवात शांततेत निघाला मूक मोर्चा !

हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू 

जखमी राहुल भोई यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोपान बोरणारे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रेम सपकाळे करत आहेत. येथे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!