गेल्या काही दिवसांपासून चिनावल व परिसरात पिक चोरी , केळी नुकसान होत असल्याने यांवर कोठे तरी सकारात्मक उपाययोजना असावी या साठी सावदा पोलिस स्टेशनला दोन्ही बाजूंच्या ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती या वेळी फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी पीक चोरी च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खरोखरच मोठे नुकसान होत आहे. [ads id="ads2"]
यातील गुन्हेगारांचा सखोल तपास करुन त्यांचेवर कारवाई केलीच जाईल या बाबत शेतकऱ्यांनी संयम राखा , गावात कायदा सुव्यवस्था कोलमडू न देता सामंजस्याने आपण कोणाचे नुकसान होणार नाही या साठी प्रयत्न करु कोणत्या तिसऱ्या व्यक्ती मुळे गावात कटू प्रसंग घडत असल्यास आपण सर्व मिळून यांची माहिती काढा जेणेकरून आपला जिव्हाळ्याचा शेती नुकसानी चां प्रश्न सुटु शकेल असे आवाहन केले.
हेही वाचा :- स्कूलबस व ॲपेरिक्षाच्या धडकेत रावेर तालुक्यातील दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार
या वेळी चिनावल पोलिस पाटील निलेश नेमाडे , गोपाळ नेमाडे , नुकसान ग्रस्त शेतकरी युवराज महाजन तसेच संजय भालेराव सर शेषराज भालेराव , दिपक लहासे , दशरथ भालेराव , आनंदा ठाकरे , युवराज भालेराव , विनोद भालेराव , उत्तम भालेराव हे या बैठकीला हजर होते .सदर वेळी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि देविदास इंगोले यांनी ही शेतकऱ्यांच्या पिक संरक्षण ला प्राधान्य देवून दोषीवर या पुढे तात्काळ कारवाई करणेचे संकेत दिले.
दरम्यान दि २३ चे रात्री वडगाव शिवारात संग्राम नेमीचद गाजरे यांचे अज्ञात ईसमानी ठीबक सिंचन चे फिल्टर ची तोडफोड करून नुकसान केले आहे या बाबत निभोरा पोलिसांत ४२७ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे

