Raver पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरातून मध्यरात्री विना परवानगी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP Faijpur) यांना मिळाली. [ads id="ads2"]
त्यानुसार रावेर पोलिसांनी (Raver Police) शहरातील बंडू चौकाकडे जाणाऱ्या राजे छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीसांनी नाकाबंदी केली असता वाळूने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २१] ०१५१) दिसून आल. त्याची चौकशी केली असता वाळू वाहतुकीबद्दल कुठलाही परवाना दिसून आला नाही.
हेही वाचा :- स्कूलबस व ॲपेरिक्षाच्या धडकेत रावेर तालुक्यातील दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार
हेही वाचा :- एरंडोलनजिक झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी
हेही वाचा :- मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! महिलांची एकमुखी मागणी ; धरणगांवात शांततेत निघाला मूक मोर्चा !
हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू
हेही वाचा :- दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात शॉक लागून एकाचा मृत्यू
पोलीसांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर रावेर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक इरफान छबु तडवी (वय-३२) शेख दाऊद शेख शाकीर दोघी राहणार बंडू चौक रावेर यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल रशिद तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रास वाळू, पंचवीस हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण २ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास रावेर पोलीस कर्मचारी करीत आहे.

