सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशातील पातोंडा (Patonda Madhya Pradesh) येथे पत्नीच्या भेटीसाठी सारसवाडीला गेलेले सायबु बाबु तडवी (वय-३०) रा. आभोडा ता. रावेर हे आपल्या तीन वर्षाची मुलगी महेक सायबु तडवी या चिमुकलीसह ॲपे रिक्षाने रावेरच्या दिशेने येत होते. [ads id="ads2"]
त्यावेळी बऱ्हाणपुरकडे (Burhanpur) जाणाऱ्या स्कूल बसने ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली आहे तर सायबु तडवी हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात खानापूर (Khanapur) जवळील नवीन चेक पोस्ट जवळ घडला आहे. जखमीवर रावेर ग्रामीण रुग्णालयात(Raver Rural Hospital) उपचार सुरु आहे.
हेही वाचा :- एरंडोलनजिक झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी
हेही वाचा :- मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! महिलांची एकमुखी मागणी ; धरणगांवात शांततेत निघाला मूक मोर्चा !
हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू
हेही वाचा :- दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात शॉक लागून एकाचा मृत्यू
दरम्यान स्कूल बस व रिक्शाच्या अपघाताची माहीती मिळताच राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य पी.के. महाजन यांच्या सह नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत एकच गर्दी केली होती. अत्यंत गरीब अठरा विश्व-दारीद्र असलेल्या परीवारावर अपघाताच्या माध्यमातुन संकट कोसळले आहे.रावेर परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

