सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस तात्काळ शिक्षा व्हावी-अमोल माळी
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
अमळनेर-येथील सामर्थ्य प्रतिष्ठान च्या वतीने धरणगाव येथील बालिका अत्याचाराविरुद्ध पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना निवेदन देण्यात आले व सदर घटनेचा निषेध करीत आरोपीस तात्काळ शिक्षेसाठी हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
निवेदनात म्हटले आहे कि आपल्या जळगाव जिल्ह्य़ातील धरणगाव शहरात चंदुलाल मराठे ह्या ६२ वर्षीय व्यक्तीने आपल्या नातवंडांच्या वयाच्या असणार्या अवघ्या ५ व ८ वर्षीय मुली अंगणात खेळत असताना त्यांना घरात बोलावून त्यांच्यासोबत अश्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असुन ही अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.[ads id="ads2 "]
आपण परक्या स्त्री ला मातेसमान वागणुक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या व फुले,शाहू,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो.आपल्या महाराष्ट्राने प्रत्येक वेळी देशाचे प्रबोधन केलेले आहे आणि आपल्या राज्यात अशी घटना घडते हि लाजिरवाणी बाब आहे.
हेही वाचा :- एरंडोलनजिक झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी
हेही वाचा :- मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! महिलांची एकमुखी मागणी ; धरणगांवात शांततेत निघाला मूक मोर्चा !
हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू
हेही वाचा :- दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात शॉक लागून एकाचा मृत्यू
ह्यामुळे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्याने सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच आपण आमच्या मागणीचा पुढील उच्य स्तरावर पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी,शिव बहुद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष रणजित शिंदे,शिवव्याख्याते प्रा लिलाधर पाटील,अर्बन बँकेचे व्हा चेअरमन प्रविण पाटिल उपस्थित होते.

