० ते ५० युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची कसून तपासणी होणार असून शुक्रवारपासून वीजचोरी शोध मोहिम सुरु होत आहे.
घरात टी.व्ही. , फ्रीज व इतर उपकरण असून हि 50 युनिट पेक्षा कमी वीजवापर असणाऱ्या ग्राहकांची कसून तपासणी करण्यात आली. मीटर मध्ये फेरफार करणारे, सर्विस वायर सोबत छेडछाड करणारे, मीटर असून हि आकोडा टाकणाऱ्यांना कायदाचा दणका देण्यात आला.[ads id="ads2"]
शुक्रवारपासून सावदा उपविभागाच्या हद्दीत 50 युनिट पेक्षा कमी वीजवापर असणाऱ्या ग्राहकांची कसून तपासणी करण्यात आली.सावदा उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्री विशाल किनगे, श्री योगेश चौधरी, सागर डोळे, कनिष्ठ अभियंता श्री मंगेश यादव, श्री सचिन गुळवे, श्रीमती सोनल पावरा सहभागी होते.या कारवाईत एकूण ११७ ग्राहकांचे मीटर तपासण्यात आले असून फेरफार २८ ग्राहकांचे वीजमीटर जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा :- दुःखद : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील २५ वर्षीय युवकाची पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या
हेही वाचा :- रावेर तहसील कार्यालयात जप्त केलेले ट्रॅक्टर भरदिवसा लांबविले ; पोलिसात गुन्हा दाखल
अशी झाली आहे, गावाप्रमाणे कारवाई -
निंभोरा गाव - ०४, दसनूर - ०३, आन्दलवाडी - ०४ , वाघोदा बु., - ०४ , कोचुर - ०४ , वाघोदा खु. - ०५, तांदलवाडी - ०२ , खिरोदा -०४
संपूर्ण महिना सुरु राहणार कारवाई
वीजचोरी रोखण्यासाठी 50 युनिट पेक्षा कमी वापर असणाऱ्या सर्व ग्राहकांची तपासणी संपूर्ण महिना सुरु राहणार आहे.

