मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील तरुणाची आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द  (Nimkhedi Khurd) येथील तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मुक्ताईनगर (Muktainagar)  येथील जुने मुक्ताई मंदिर (Muktai Mandir) रस्त्यावरील आस्थानगरी जवळ मंगळवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. अविनाश अरुण लवांडे (22) असे मयत तरुणाचे नाव आहे.[ads id="ads1"] 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

निमखेडी खुर्द (Nimkhedi Khurd) येथील अविनाश अरुण लवांडे (22) हा पत्नीसह मुक्ताईनगर (Muktainagar)  येथील अष्टविनायक कॉलनी (Ashtvinayak Colony)  येथे लग्नासाठी आला होता. त्यानंतर त्याने बाहेरुन येतो, असे पत्नीला सांगुन मंगळवारी दुपारी चार वाजता निघाला मात्र बराच वेळ परत आला नाही.   [ads id="ads2"] 

  त्याचा सायंकाळी सात वाजेपर्यंत नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही त्यामुळे सुनील उत्तम लवांडे यांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. परंतु अविनाश अरुण लवांडे (Avinash Arun Lavande) याचा मृतदेह मंगळवार, 8 रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर (Muktainagar) ते जुने मुक्ताबाई मंदिर (Muktanai Mandir) मार्गावरील आस्थानगरीजवळ आढळून आला. 

हेही वाचा :- ५० युनिट वीजवापर करणाऱ्या ग्राहकांची होणार कसून तपासणी ; सावदा विभागाने तयार केले विशेष पथक 

हेही वाचा :- दुःखद : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील २५ वर्षीय युवकाची पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या 

हेही वाचा :- रावेर तहसील कार्यालयात जप्त केलेले ट्रॅक्टर भरदिवसा लांबविले ; पोलिसात गुन्हा दाखल 

मयत तरुण हा विविध कार्यकारी सोसायटीतील सेक्रेटरी अरुण लवांडे यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परीवार आहे. दरम्यान सुनील उत्तम लवांडे (46, निमखेडी) यांनी मुक्ताईनगर पोलिसात (Muktainagar Police) खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार शैलेश चव्हाण करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!