दुसखेडा ग्रामसेवकाने नमुना नं.8 व नमूना 9चे वाचन केले भुसावळ शासकीय विश्रामगृहात ? गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

          दि.9फेब्रुवारी2022 रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची "ड" यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते.[ads id="ads2"] 

   परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज सुटीवर असून सुद्धा दुसखेड़ा ग्रामपंचायतीचे दप्तर नमुना नंबर आठ व नमुना नंबर नऊ हे भुसावळ शासकीय विश्रामगृहात घेऊन गेले व सरपंच यांचा मुलगा व ग्रामसेवक यांनी विश्रामगृहात त्या मंजूर घरकुल यादीचे वाचन केले,म्हणजे घरकुल यादीचे वाचन हे ग्रामपंचायत मध्ये आणि ग्रामसभेत न करता आपल्या सोईनुसार मनमानी करून अनाधिकृत ठिकाणी यादीचे वाचन केले याची आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही खालील सह्या करणारे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात गेले असता त्या ठिकाणी ग्रामसेवक व सरपंच यांचा मुलगा मंजुर घरकुल यादी ची छाननी करीत असताना आम्ही प्रत्यक्ष बघितले.

हेही वाचा :- ५० युनिट वीजवापर करणाऱ्या ग्राहकांची होणार कसून तपासणी ; सावदा विभागाने तयार केले विशेष पथक 

हेही वाचा :- दुःखद : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील २५ वर्षीय युवकाची पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या 

हेही वाचा :- रावेर तहसील कार्यालयात जप्त केलेले ट्रॅक्टर भरदिवसा लांबविले ; पोलिसात गुन्हा दाखल 

तरी यांनी शासकीय सर्व नियम धाब्यावर ठेवून घरकुल यादीचे वाचन दुसखेडा ग्रामपंचायत येथे न करता दुसऱ्या तालुक्यात म्हणजे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात केले असे दिलेल्या तक्रार अर्जात दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुभाष दगडू सोनवणे,महेंद्र गंगाराम बारे यांनी नमूद केले आहे त्यामुळे आता यावल पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास IAS अधिकारी नेहा भोसले काय कार्यवाही करतात याकडे यावल तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवकांचे,राजकारणाचे,दुसखेडा ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!