आयशरच्या धडकेत 25 जखमी ; रावेर तालुक्यातील खिरोदा गावाजवळची घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर (Raver) तालुक्यातील खिरोदा (Khiroda) गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन आयशरची समोरासमोर धडक झाल्याने चालकांसह २५ ते ३० जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.[ads id="ads2"]  

सविस्तर वृत्त असे की की, रावेर तालुक्यातील(Raver Taluka)   वाघोदा बुद्रुक (Waghoda Bk)येथील लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारा आयशर ट्रक (एमएच १९ जे ७७३८) ची खिरोदा (Khiroda) गावाच्या पुढे पालकडून येणाारी दुसरी आयशर (एम.एच १८ एए २०२०)ही भरधाव वेगाने येत असतांना दोघांची समोरासमोर धडक देवून अपघात झाला. 

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील थेरोळे येथील बस चालकाची आत्महत्या 

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक; जि.प.वरही २१ मार्चपासून प्रशासक 

ही घटना रविवारी १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वऱ्हाडी घेवून जाणाऱ्या ट्रकमधील २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी खिरोदा गावातील श्रीहरी गोशाळेचे कार्यकर्ते व तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदा चौधरी ग्रा पं माजी सदस्य ललित चौधरी व रूपेश पाटील, सपोनि देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पो हे कांन्सटेबल मेहेरबान तडवी यांनी सर्व जखमींना सरकारी दवाखाना खिरोदा येथे प्रथमोपचार करून रुग्णवाहिकीने पुढील औषधोपचार साठी फैजपूर येथील शैलेंद्र खाचणे यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!