सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरत हा वडील भिकन दगा पाटील, आई वंदना, पत्नी व लहान भावासह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने कर्ज काढून चारचाकी घेतली होती. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. आई, वडील शेतीचे काम बघत होते स्वतःच्या मालकीची थोडीच शेती आहे. [ads id="ads2"]
चारचाकीवर पुणे, नागपूर, मुंबई व गुजरात अशा लांब ठिकाणी दोघे भाऊ जात असत. लहान भाऊ गाडी घेऊन मुंबईला गेला होता, तर भरत घरीच होता.सोमवारी रात्री कुटुंबासोबत त्याने जेवण केले. पुढच्या खोलीत आई वडील, तर मागच्या खोलीत पती-पत्नी झोपले होते. पहाटे चार वाजता पत्नी झोपेतून उठली असता, पतीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार पाहून तिने एकच हंबरडा फोडला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली

