ग्रामसेवक शिवाजी सोनवणे यांचे वर कारवाई करा : प्रा.डॉ.जतीन मेढे यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील वाघोदा खु (Waghoda Khurd) येथील तत्कालीन ग्रामसेवक (Gramsevak) श्री शिवाजी सोनवणे यांनी एन्जोप्लास्टी झालेली असतांना हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे भासवून बदलीस पात्र असतांना सन २०१७ ते सन २०२० पर्यंत बदलीतून सूट मिळविल्याचेही उघड झाले आहे.[ads id="ads2"]  

   तसेच त्यांनी १४ वा वित्त आयोगाच्या कामावर एकही मजूर न लावता ग्रा प (Grampanchayat) चे कामकाज करतांना प्रशासकीय व आर्थिक अनियमितता केलेली असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Rastravadi Congress) सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. जतीन मेढे (Prof.Dr.Jatin Medhe) यांनी रावेरच्या गट विकास अधिकारी (Raver BDO) यांचेकडे केली आहे, श्री सोनवणे यांच्याबाबत वर्षभरापासून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत ; मात्र गटविकास अधिकारी (Raver BDO) त्यांना पाठीशी घालत असल्याचेच दिसून येत आहे. प्रा. डॉ. जतीन मेढे (Prof.Dr.Jatin Medhe)  यांच्या तक्रारी नंतर तरी कारवाई होईल का, या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.

ग्रामसेवक शिवाजी सोनवणे यांचे वर करवाई करा : डॉ. जतीन मेढे यांची मागणी

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!