सर्व मान्यवरांचे महापौर सौ.महाजन यांनी केले स्वागत
जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात त्यांच्यासमवेत राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब, जलसंपदामंत्री मा.ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचीही उपस्थिती लाभणार आहे.[ads id="ads1"]
आज शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचेसुद्धा आगमन झाले. [ads id="ads2"]
जळगाव शहरातर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच आदरणीय खा.श्री.पवार साहेबांचे आशीर्वादही घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते श्री.रविंद्रभैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या या दौर्या दरम्यान जळगाव शहर विकासासंदर्भात आपल्याकडून आम्हाला निश्चितपणे बहुमोल मार्गदर्शन मिळेल, ही अपेक्षा व्यक्त केली.


