
शेतीच्या वाटणी वरून रावेर शहरातील दोन गटांच्या परस्पर तक्रारीवरून तहसील कार्यालयात सुनावणी होती. सुरूवातीला सुनावणी दरम्यान रावेर तहसील कार्यालयाच्या आवारात सुद्धा हाणामारी झाली. [ads id="ads1"]
त्यामुळे दोन्ही गट रावेर पोलीस स्टेशनमध्ये ऐकमेकां विरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता. पोलीस सेशनच्या आवारात सुद्धा दोन्ही गटांमध्ये तुडुंब हाणामारी झाली. त्यामध्ये पोलीसांनी आवरून सुद्धा मारामारी करणारे ऐकमेकांना सोडत नव्हते.[ads id="ads2"]
पोलीसांनी खाक्या दाखवल्या नंतर भांडण आवाक्यात येवून रावेर पोलीस स्टेशनचे पो.निरिक्षक कैलास नागरे यांनी दोघेही गटाच्या लोकांना फिर्यादीवरून अशोक गायकवाड, आकाश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, तसेच दुसऱ्या गटाचे नगीन मोपारी, शांताराम मोपारी, जयेश मोपारी, चंपालाल मोपारी, दुर्गेश मोपारी, मयूर मोपारी. अशा ९ जणांवर कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून सर्वच्या सर्व ९ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सुरेश मेढे करीत आहे.
हेही वाचा :- ट्रक आणि बसच्या समोरासमोर धडकेत आठ प्रवासी जखमी

