रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे)रावेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकीत श्री अरविंद झोपे जिल्हा कार्याध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला कार्याध्यक्ष वर्षा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली रावेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या महिला कार्याध्यक्ष पदी सुलक्षणा राजेश रायमळे पोलीस पाटील तामसवाङी ता.रावेर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असेकी, आज दि २७ एप्रिल २०२२ बुधवार रोजी श्री अरविंद झोपे जिल्हा कार्याध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला कार्याध्यक्ष वर्षा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शना खाली रावेर तालुका पोलीस पाटील संघटनेची सर्व साधारण सभा कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर च्या सभागृहात घेण्यात आली या वेळी पोलीस पाटील संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला.[ads id="ads2"]
त्यात पोलीस पाटील यांना प्रवास भत्या बाबत चर्चा करण्यात आली.तसेच पोलीस पाटील यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. संघटनेच्या जमा खर्चाचे वाचन करून मंजुरी देणे. तसेच रावेर तालुका पोलीस पाटील संघटनेचे 3 वर्ष पूर्ण झाल्याने व संघटनेच्या ठरावा प्रमाणे जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी निवड करण्या संदर्भाचा प्रस्ताव श्री झोपे दादा यांनी ठेवला यात योगेश पाटील पोलीस पाटील निंबोल यांची पुनश्च तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यातआली.
कार्यकारिणीत सचिव पदी निलेश नेमाडेउ पाध्यक्ष पदी रईसभाऊ तडवी,मंदाताई पाटील हिला कार्याध्यक्ष पदी सुलक्षणा राजेश रायमळे ,सदस्य पंकज बेंडाळे, कैलास पाटील,दीपक चौधरी,योगिता पाटील,अस्लम तडवी,यांची निवड झाली
सदर सभेस रावेर पोलीस स्टेशन, निंभोरा पोलीस स्टेशन व सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील बहुसंख्य पोलीस पाटील हजर होते.
या मंगल समयी सुलक्षणा राजेश रायमळे यांची महिला कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तसेच नूतन महिला कार्याध्यक्ष यांचे पती पत्रकार राजेश वसंत रायमळे यांना वकील म्हणून सनद मिळाल्याबद्दल दोघं पती पत्नींचे रावेर तालुका पोलीस पाटील संघटने मार्फत हर्षोल्हासात अभिनंदन व स्वागत करण्यात आले.


