यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ ट्रक व बस यांची समोरासमोर झालेल्या धडकेत आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ बुधवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान रावेर बस (Raver Bus Depot) आगाराची बस क्रमांक (एचएच ४० एन ९०६३) ही प्रवासी घेवून जळगावकडून रावेरला जात होती, दरम्यान, फैजपूरकडून भुसावळकडे जाणार ट्रक (युपी ८० सीटी ७५३६) हा जात असताना भोरटेक गावाजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली.[ads id="ads2"]
या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर घडली आहे.
हेही वाचा :- रावेर पोलिस स्टेशन समोरच फ्री स्टाईल हाणामारी
सर्व जखमींना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


