रस्त्याचे काम प्रगतीपथावर ; नागरिकांमध्ये आनंद
साकळी ता.यावल (गोकुळ कोळी) वार्ताहर-चोपडा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट महिला आ.सौ.लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत आण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नातून गावांतर्गत रस्त्यांना पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाअंतर्गत गावातील (वार्ड क्रं.५) मधील भवानी पेठ भागातील मुख्य वापराच्या रस्त्यावर दहा लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामास सुरुवात झालेली असून रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.सदर रस्त्याचे काम होणार असल्यामुळे नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने मोठी सोय होणार आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. [ads id="ads1"]
शिवसेनेचे विभाग प्रमुख महेंद्र चौधरी, वार्ड क्रं. पाचच्या ग्रा.पं.सदस्या तथा शिवसेना महिला तालुका आघाडीच्या पदाधिकारी सौ.निलिमा चंद्रकांत नेवे तसेच शाखाप्रमुख संतोष महाजन यांनी सदर रस्तावर पेव्हर ब्लॉकचे काम व्हावे यासाठी आ. सौ.लताताई सोनवणे व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. साकळी गावात या अगोदरही आ.सौ लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या विकास निधीतून रस्त्यांचे तसेच इतर कोट्यावधी रुपयांचे विकास कामे केलेली आहे.[ads id="ads2"]
सदर रस्त्याच्या कामाची पाहणी दरम्यान शिवसेना विभागप्रमुख महेंद्र चौधरी, शाखाप्रमुख संतोष महाजन, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी, शाविप्र संचालक गंगाराम कोळी, शिवसैनिक प्रवीण माळी, नुतन विकासोचे संचालक ईश्वर कोळी,अरुण बोरसे,बाळूभाऊ बडगुजर उपस्थित होते.सदर रस्त्याचे काम होत असल्याबद्दल वार्डातील नागरिकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त केले जात असून या भागातील नागरिकांनी आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानले आहे.