यावलला प्रेम प्रकरणातुन एका तरुणावर तिन जणांकडुन तिक्ष्ण हत्याराने केला जिवघेणा हल्ला ; तरूणाची प्रकृत्ती गंभीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) शहरातील काजीपुरा वस्तीतील 21 वर्षीय तरुणावर तीन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री येथील भुसावल रस्त्यावरील पीर बाबा दर्ग्याजवळ घडली आहे.हा हल्ला त्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत महीलेशी असलेल्या प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.[ads id="ads1"] 

यावल शहरातील काजीपुरा वस्तीतील रहिवासी जावेद युनुस पटेल(वय२१)याचे एका विवाहित महिलेशी प्रेम संबंध होते दरम्यान फैजपूर येथील तीन जणांनी गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जावेद पटेल यास गोड बोलुन दुचाकीवर बसवून येथील भुसावल रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ आणत त्याचेवर तीन जणांनी चाकूने सपासप वार करून जिवघेणा हल्ला करीत त्यास गंभीर जखमी केले आहे.[ads id="ads2"] 

   घटनास्थळावरून तीनही संशयित आरोपी फरार झाले दरम्यान मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काही आदिवासींना जावेद जखमी अवस्थेत रस्त्यावर, पडलेला दिसून आल्याने त्यांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल केले हा जिवघेणा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलिस अधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जखमीस रात्री जळगाव येथे सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!