रावेर तालुक्यातील पातोंडी येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विष घेवून आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
रावेर तालुक्यातील पातोंडी येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विष घेवून आत्महत्या

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील पातोंडी (Patondi) येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर रावेर पोलिसात (Raver Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुकयातील पातोंडी (Patondi Taluka Raver) येथील किशोर श्रावण पाटील (वय ४०) हे सकाळी आपल्या मालकीच्या शेतात गेले व तेथे काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मयत किशोर पाटील यांना एक मुलगा असुन तो ही कर्णबधीर आहे.[ads id="ads2"] 

  घटनेची माहिती मिळताच पातोंडी (Patondi) गावातील नागरीकांनी देखिल घटना स्थळाकडे घाव घेतली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा कयास उपस्थित नागरीक लावत होते. याबाबत रावेर पोलिसात (Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!