सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सावदा शहरातील दुर्गामाता मंदिर परिसरातील तडवी वाड्यात राहणारा विवाहित तरुणांचा घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.[ads id="ads2"]
शहरातील तडवी वाडा येथिल रहिवासी शशीकांत मधुकर लोखंडे यांच्या पत्नी शुक्रवार २४ जून रोजी दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास रेशन घेण्यासाठी गावातील दुकानात गेल्या होत्या त्यावेळी शशीकांत हा घरी एकटाच असल्याने त्यांनी दोरीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.[ads id="ads1"]
सदरील धक्कादायक घटना पत्नी रेशन घेवून घरी आल्यावर उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शेजारचांच्या मदतीने रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. सावद पोलीसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूचे नोंद घेण्याचे काम सुरू आहे.


