रावेर तालुक्यातील जानोरी (Janori Taluka Raver)येथील २१ वर्षीय युवक सरपण गोळा करण्यासाठी शेती शिवारात गेला होता. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून तो जागीच ठार झाला. मुकद्दर कलिंदर तडवी असे त्याचे आहे.[ads id="ads2"]
तो कुटुंबातील एकुलता एक होता. यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital) रात्री उशीरा शवविच्छेदन झाले. मुकद्दर गुरुवारी दुपारी सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक वादळ व पाऊस सुरू झाला. मुकद्दर झाडाखाली थांबला. मात्र, काही वेळात वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच जानोरी सरपंच गंभीर तडवी, ग्रामपंचायत सदस्य मनोज तडवी, राजू तडवी, संजय तडवी, मजीत तडवी यांनी त्याचा मृतदेह Yawal ग्रामीण रुग्णालयात आणला. सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


