झाड पडल्याने यावल-चोपडा रस्त्यावर वाहतुकिचा खोळंबा ; काही तासाने वाहतूक पूर्वपदावर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
यावल (सुरेश पाटील) यावल शहर व यावल तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात चोपडा रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. पावसातच यावल (Yawal) येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. नंतर वाहतूक सुरळीत झाली. गेल्या काही दिवसांपासून यावल शहर व यावल तालुक्यात चांगला पाऊस झालेला नव्हता. यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे होत्या. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.[ads id="ads2"]  
हा पाऊस यावल शहरासह तालुक्यातील दहिगाव, सावखेडासीम, नावरे, साकळी या भागात कोसळला. तर वादळी वाऱ्यामुळे चोपडा रस्त्यावरील नावरे फाट्याजवळ  मोठे झाड कोसळले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यामुळे दिलासा मिळाला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!