राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व त्यांच्या शैक्षणिक विचारांची वर्तमानात आवश्यकता हा निबंध स्पर्धेचा विषय होता.आजच्या तरूणांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी तसेच महापुरूषाचे विचार व कार्य कळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती[ads id="ads1"] .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव वले हे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन भालोद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वर्षा नेहेते मॅडम उपस्थित होत्या.ज्येष्ठ समाजसेवक मा.श्री.रघुनाथ अप्पा सोनवणे, प्रागतिक विचारमंचचे अध्यक्ष मा.श्री.जे.पी.सपकाळे सर, नॉलेज सेंटर भुसावळच्या संचालिका मा.वंसिका मॅडम, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे सर , प्रा.डॉ.दिनेश पाटील सर, मा.प्रा.डॉ.जतिन मेढे सर, शहिद भगतसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे सर तसेच विजेते , सहभागी स्पर्धक व पालक उपस्थित होते.


