यावल दि.31 (सुरेश पाटील) तालुक्यातील मोहराळा गावात पुर्व , पश्चिम क्षेत्र आणी वनविभागाच्या गस्ती पथकाच्या संयुक्त कारवाईत सुमारे तिन लाख रुपयांचे बेकायद्याशीर सागवान जातीच्या कटींग केलेले लाकुड व कटाई चे साहीत्य जप्त करण्यात आले आहे . वन विभागाच्या या कारवाईमुळे सातपुडा जंगलातील मोल्यवान वृक्षांची तोड करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार मोहराळा तालुका यावल या सातपुडा पर्वताच्या पायथ्पाशी असलेल्या या गावात गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर संशयीत असलेले अय्युब हसन तडवी यांच्या घरात कुठलेही परवानगी चे पत्र नसतांना बेकायद्याशीररित्या सुमारे दोन घन मिटर सागवानचे कट साईज केलेले ५६ नग लाकडाच्या पाटया व सुमारे ४० हजार रुपये किमतीची कटाई मशीन व २० हजार रूपये किमती मोटर यंत्रणा असा एकुण तिन लाख रूपये किमतीचे साहित्य जात करण्यात आले आहे .[ads id="ads2"]
वन विभागाचे धुळे विभागाचे वनसंरक्षक डी.डब्ल्यू . पगार , जळगाव विभागाचे डीएफओ एच एस . पद्दमाभन यांच्या आणी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हळपे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पुर्व आणी पाश्चिम तसेच गस्ती पथकाच्या कारवाईत पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस टी भिलावे, पाश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर , बि वाय नलावडे , वनसंरक्षक प्रमिला मराठे , सरला भोंगरे , गस्ती पथकाचे आनंदा पाटील,हरिपुरा क्षेत्राचे वनपाल आर बी पाटील , आर पी तायडे , वाघझीरा क्षेत्राचे वनपाल आर एस शिंदे , पोलीस हवलदार सचिन तडवी , वनपाल विलास पाटील , वनपाल योगेस सोनवणे , ए एम तडवी , वाहनचालक ईमाम तडवी यांच्यासह आदी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या संयुक्त कार्यवाहीत आपला सहभाग दिला. यावेळी वनसंरक्षक धुळे डी डब्ल्यु पगार , सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हळपे यांनी आपल्या सर्व अधिकारी व वन विभागातील सर्व कर्मचारी यांचे या कारवाई सहभागा बदल कौतुक केले .


