साकळी फाटा ते साकळी गावात येणारा मुख्य असून या रस्त्यावरच अंजुमन उर्दू हायस्कूल व ज्यु कॉलेज सुद्धा आहे आणि साचलेल्या पाण्याच्या या रस्त्यावरुन विद्यार्थी,शिक्षक तसेच नागरिकांना पायवाट काढत जावे लागते या साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना पुढील प्रवसावेळी रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघात देखील होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.[ads id="ads1"]
नागरिक देखील या समस्येला संतापले असून स्थानिक पातळीवर त्यावर काही मार्ग निघत नसल्याचे सांगितले.जाते अनेक वर्षापासून या रस्त्या संबधात नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासन ( ग्रा.पं.) तसेच वरिष्ठांना याविषयी मार्ग काढण्याचे निवेदन दिले मागील वर्षी सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे,अंजुमन उर्दू हायस्कूल चे शिक्षक फैसल खानसर,अबरारसर व नागरिकांनी देखील या रस्त्यावरील पाण्यात बसून आंदोलन केले होते यावेळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी लवकरच यावर निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
हेही वाचा :- डांभुर्णी येथे मोफत आरोग्य शिबीराला चांगला प्रतिसाद
मात्र पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा या रस्यांवर पाणीही तसेच साचत आहे मात्र प्रसासनाने व लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे हे स्पष्ट दिसते हा एकमेव रस्ता असून देखील मग त्याला गटार का नाही? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.तरी यावर तात्काळ मार्ग काढून विद्यार्थी व नागरिकांना त्रास कमी होईल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे