डाँ सुनील पाटील यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
मनवेल ता.यावल (गोकुल कोळी) : साकळी येथील जिल्हा परीषदच्या उर्दू व मराठी शाळेतील मुलीच्या शाळेत स्वच्छतागृह बाधण्यात यावे अशी मागणीचे निवेदन भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डाँ सुनील लक्ष्मण पाटील यांनी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ पंकज आशिया यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.[ads id="ads2"]
जि.प.उर्दू व मराठी मुलीच्या शाळेत दोनशेच्या वर मुली व पाच सहा महिला शिक्षिका आहे.शाळेतील स्वच्छतागृहाची दैयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे मुली व महिला शिक्षकांची गैरसोय व कुचंबना होत आहे.शाळा व्यवस्थापन समीती मार्फत निवेदन दिले गेले असून याकडे दुर्लक्ष होत आहे.[ads id="ads1"]
केद्र व राज्य शासन शिक्षणाला प्राधान्य देत मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नीधी खर्च करीत आहे मग जि.प.शाळेच्या उर्दू व मराठी या शाळेत प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे याकडे आपन सकारात्मक विचार करुन मुलीची आवश्यक गरज लक्षात घेऊन नवीन स्वच्छतागृह बांधण्यात यावे अशी मागणी डाँ सुनील पाटील यांनी निवेदणा द्वारे केली आहे.



