रावेर पंचायत समितीच्या वैयक्तिक शौचालय प्रोत्साहनपर अनुदान घोटाळ्यातील रावेर पं.स.च्या मुख्य लेखा अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण गेल्या अडीच महिन्यांपासून फरार होते. याशिवाय आणखी १०४ संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.[ads id="ads2"]
रावेर पंचायत समितीचे मुख्य लेखा अधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील (५७, रा. स्टेशन रोड, रावेर) तसेच नजीर हबीब तडवी (३६), रवींद्र रामू रायपूरे (४६), रूबाब नवाब तडवी (६८), हमीद महेमूद तडवी (४२, सर्व रा. पाडळे बुद्रुक), बाबुराव संपत पाटील (६७, रा. विवरे खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.[ads id="ads1"]
या सर्वांना दिनांक 7जुलै रोजी न्यायालयात दाखल केले असता रावेर येथील मा.दिवाणी न्या. प्रविणकुमार यादव यांनी या सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांतर्फे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सरकारतर्फे अॅड. इरफान रंगरेजे तर आरोपीतर्फे अॅड. योगेश गजरे व अॅड. धनराज पाटील यांनी काम पाहिले.



