https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

रावेर पंचायत समितीतील शौचालय घोटाळ्यातील मुख्य आरोपीना रावेर पोलीसांनी केली अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर पंचायत समिती

रावेर पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) शौचालय योजनेच्या भ्रष्टाचारातील फरार असलेला मुख्य संशयित आरोपी हा आज सकाळी रावेर पोलीसांना (Police Raver) शरण आला आहे तर दुसरा संशयिताला अजंदे (Ajande)  गावातून पोलीसांनी अटक केली आहे.आता आरोपींची संख्या आठ वर पोहचली आहे.[ads id="ads2"]  

काय आहे नेमके हे प्रकरण ? 

रावेर पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्या वर अपहार झाला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police) अडीच महीन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे फरार होते. रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा टेक्निकल, तांत्रिक व मॅक्रो पध्दतीने तपास सुरु होता. अखेर या भ्रष्ट्राचाराला जबाबदार असलेले आरोपींच्या अटकसत्रला सुरुवात झाली आहे.[ads id="ads1"]  

आतापर्यंत यांना केली  आहे अटक

या प्रकरणी काल रात्री उशिरा Raver पंचायत समितीचे वरिष्ठ साहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (दोघे रा पाडळा बु), बाबुराव संपत पाटील रा. विवरे खुर्द ता. रावेर, रुबाब नवाद तडवी, हमीद महेमुद तडवी दोन्ही रा. पाडळा यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी मुख्य आरोपी समाधान निंभोरे हा रावेर पोलीसांना शरण गेला आहे. तर दुसरा फरार असलेला आरोपी विलास सावकारे याला देखील ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत आरोपींची संख्या ८ वर पोहचली आहे.

 हेही वाचा : - रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय अनुदान घोटाळ्यातील सहा जणांना पाच दिवसाची पोलीस कोठडी 

हेही वाचा :- पोलिस भरतीच्या प्रक्रियेत बदल ; कशी असणार ? वाचा सविस्तर

आता मुख्य आरोपी समाधान निंभोरे यांच्याकडून महत्वाची माहिती मिळणार असून शौचालय योजनेच्या एवढ्या मोठ्या रकमेचा व्हिलेवाट निंभोरे यांनी कशी लावली ? रावेर पंचायत समितीतील (Raver Panchayat Samiti) अजून कोणकोण अधिकारी अधिकारी व पदाधीकाऱ्यांचा या भ्रष्टाचारात सहभाग आहे हे लवकरच जनतेसमोर येणार आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!