पोलिस भरती प्रक्रियेत राज्य शासनाने अलीकडेच मोठा बदल केला. पूर्वी १०० गुणांची होणारी शारीरिक चाचणी आता ५० गुणांची हाेईल. तसेच आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.यापूर्वी पोलिस भरती पात्रता ही महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती सेवा प्रवेश नियम २०११ नुसार निश्चित करण्यात आली होती. [ads id="ads2"]
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलिस शिपाई भरती प्रक्रियेच्या पात्रता निकषात बदल केला आहे. हा नियम महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवा प्रवेश (सुधारित) नियम २०२२ म्हणून ओळखला जाईल. या सेवा प्रवेश नियमात महत्त्वाचे दोन बदल केले.[ads id="ads1"]
असा होणार परिणाम
पोलिस भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात नशीब अजमावतात. १०० गुणांच्या शारीरिक चाचणीत ९०पेक्षा अधिक गुण पटकावत या तरुणांचा मार्ग सुखर होत होता. लेखी परीक्षेसाठी त्यांना सोयी-सुविधा, पुस्तके, ग्रंथालये मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. परिणामी त्यांचा कल शारीरिक चाचणीकडे अधिक असायचा. आता त्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा तर ५० गुणांची शारीरिक चाचणी आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्रित गुणांच्या टक्केवारीत मोठी घट निर्माण होण्याची शक्यता आहे.
लेखी परीक्षा अशी होईल
अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण अशा विभागांना प्रत्येकी २५ प्रमाणे १०० गुणांची लेखी परीक्षा होईल. त्यासाठी ९० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० मुले उत्तीर्ण होतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया गुणवत्तेनुसार पार पाडली जाणार आहे.



