सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील मौजे भोकरी येथे खुल्या जागेवर बिगर शेती गट न.5/3 या जागेवर संविधान सभागृह निर्माण करावे या एकमेव मागणीसाठी या पूर्वी रावेर येथे रेल रोको आंदोलन व भोकरी ते रावेर असा लाँग मार्च ही काढला होता.
या बाबत रावेर तहसील ला स्मरणपत्र देऊन आठवण करून दिली...व दि.12/8/2022 रोजी निवेदन देण्यात आले की, संविधान आर्मी च्या वतीने लेखी जबाब दो बद्दल अर्धनग्न तिंरगा मोर्चा दि.15/8/2022 रोजी काढणे बाबत आम्ही संविधान आर्मी चे पदाधिकारी आपणास स्मरण पत्र देऊन बरेच द्या तहसीलदार रावेर, जिल्हाधिकारी जळगाव व सर्व वरिष्ठ मंहसुल कार्यलया कडे अर्ज दिले, निवेदन दिले, मोर्च काढले. रेल रोखो आंदोलन केले पंरतु शासन प्रशासनाने आमची मागण्याची दखल घेतले नाही दुलक्ष केले आहे.
तरी संविधान आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे संविधान आर्मी चे संविधान रक्षक सैनिक सिध्दार्थ भाऊ झाल्टे खानदेश प्रमुख एकनाथ भाऊ गाढे रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे यांच्या नेतृत्वाखाली दि.12/8/2022/ रोजी संविधान आर्मी तर्फे लेखी जबाब दो तिरंगा मोर्चा अर्धनग्न मोर्चा एक हातात तिरंगा व एक हातात संविधान घेऊन व संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर याची प्रतीमा घेऊन मोर्चा चे निवेदन तहसीलदार रावेर यांना दिले असता त्यांनी निवेदनाची दखल होता च तात्काळ चौकशी चे आदेश देऊन जागा मागणीचा प्रस्ताव वरीष्ठ अधिकाराकडे पाठविणार असे सांनुन रावेर तहसील कार्यालय चे नायब तहसीलदार यांनी संविधान आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे,युवा जळगाव जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ झाल्टे, खांनदेश प्रमुख एकनाथ गाढे, रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे व पदाधिकारी यांच्या सोबत विनवणी करून दि.15/8/2022 रोजी कोणत्याही मोर्चाचे नियोजन करु नये अशी विनंती केली म्हणून तहसीलदार नायब तहसीलदार संजय तायडे यांनी लेखी पत्र दिल्या मुळे मोर्चा काढण्यास स्थगिती दिली त्यावेळेस नायब तहसिलदार संजय तायडे यांचे सविधान आर्मी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आभार मानले.


