या बाबत सविस्तर वृत्त असे की, मोटरसायकल वरील आई व मुलगा मुक्ताईनगर कडे(Muktainagar) जात असतांना पातोंडी(Patondi) नजिक मोटरसायकलवर मागे बसलेली महिला मिरा रविंद्र वाघोदे (वय 48 रा. चिनावल) यांचा मोटरसायकलवरुन खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाली. [ads id="ads2"]
त्यांना तात्काळ उपचारारसाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालय(Raver Rural Hospital) येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. खड्डा चुकवतांना मृत्यु झाल्याची चर्चा रावेर ग्रामीण रुग्णालयात जमलेल्या नागरीकांमध्ये होती.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बु येथील ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा च-हाट्यावर ?
अशीच घटना गेल्या आठवड्यात ब-हानपुर- अंकलेश्वर (Burhanpur-Ankleshwar) महामार्गावर रावेर नजिक घडली होती. यामध्ये देखिल एका महिलेचा मृत्यु झाला होता.अजून कित्येक लोकांचा बळी गेल्यावर आमदार, खासदार,अधिकारी खड्डेमय रस्त्याकडे लक्ष देणार ? असा संतप्त सवाल "साप्ताहिक सुवर्ण दिप" विचारत आहे.


