मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार ; हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित मंदिर विश्वस्त बैठकीत एकमुखाने संमती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील) मंदिरे ही सात्त्विकता,चैतन्य मिळवण्याची क्षेत्र आहेत.तेथे योग्य पेहराव घालून गेल्यास भाविकाला निश्चितच त्या मंदिरातील चैतन्य मोठ्या प्रमाणात ग्रहण करता येते. त्यामुळे भाविकानाच त्याचा लाभ होतो.यामुळे यापुढे भाविकांचा विचार करून मंदिरात वस्त्रसंहिता लागू करू,असा महत्वपूर्ण ठराव अमळनेर,जळगाव येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह देवस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत एकमुखाने संमत करण्यात आला. [ads id="ads1"] 

  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'मंदिर संस्कृती जतन आणि संवर्धन' या विषयावर मंदिर विश्वस्त,पुजारी यांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनिल घनवट यांची उपस्थिती लाभली.मंदिरे हि धर्मशिक्षणाची केंद्रे बनणे आवश्यक-सद्गुरु नंदकुमार जाधव आज देशात अनेक आस्थापने अशी आहेत,जेथे वस्त्र संहिता लागू आहे आणि त्याचे पालनही समाज करत आहे. मंदिरात वस्त्र संहिता लागू केल्याने भाविकांनाच त्याचा लाभ होईल.तसेच मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनणे आवश्यक आहे.[ads id="ads2"] 

मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन आवश्यक- -सुनील घनवट,हिंदु जनजागृती समिती मंदिरांचे सरकारीकरण होणे,मंदिर परंपरांवर आघात होणे,मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण होणे,मंदिराचे पावित्र्य भंग करणे,मंदिरातील दानपेट्या फोडणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे.अशा प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.सद्गुरु नंदकुमार जाधव,श्री मंगळग्रह देवस्थानचे सहसचिव बहिरम,श्री पद्मालय गणेश मंदिराचे विश्वस्त डॉ.पांडुरंग पिंगळे आणि समितीचे सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने बैठकीचा प्रारंभ झाला.या प्रसंगी मंदिरांवर होत असलेल्या विविध आघातांची एक व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली.या बैठकीला प्रामुख्याने मंगळग्रह देवस्थान, एरंडोल येथील श्री पद्मालय गणेश मंदिर,पारोळा येथील श्री बालाजी मंदिर,धुळे येथील शक्तीपीठ श्री एकविरा देवी मंदिर,पारोळा येथील श्रीराम मंदिर,अमळनेर येथील श्री कपिलेश्वर मंदिर,श्री वर्णेश्वर महादेव मंदिर,जळगाव येथील श्री शनी मंदिर,श्री दत्त मंदिर,बोरनारे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आदी मंदिरांचे विश्वस्त,पुजारी बैठकीला उपस्थित होते.या बैठकीची सर्व व्यवस्था श्री मंगळग्रह मंदिर संस्थानने पाहिली. 

बैठकीत संमत झालेले ठराव :-

1)राज्यातील सर्व मठ,मंदिरे, देवस्थान सरकारमुक्त करून ती भक्तांकडे सोपवण्यात यावी, याविषयी शासनाकडे मागणी करणे.2)मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी.3) मंदिराच्या 500मीटर परिसरात मांस आणि मद्य विक्रीची दुकाने नसावीत,यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.4)प्रत्येक 2महिन्यांनी अशी मंदिर विश्वस्त बैठक आयोजित करून त्यातून पुढील कृतींचे नियोजन करण्यात यावे.यासाठी प्रशांत हेमंत जुवेकर यांच्याशी मोबा.क्र. 95 52 42 64 39 वर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!