दिनांक 12/08/2022 रोजी रावेर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विभाग तसेच ज्युनिअर विभाग व स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर यांच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व ज्यू. कॉलेज प्राचार्य राजू पवार सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका धांडे मॅडम. पवार सर माध्यमिक, पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो, इंग्लिश मीडियम प्राचार्य जी.बी.थॉमस, संतोष चाको या सर्व विभाग प्रमुखांनी सर्वप्रथम भारत मातेचे तसेच तिरंगी ध्वजाचे पूजन केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार सर संस्थेच्या सचिव मनीषा पवार मॅडम यांनी या रॅलीस शुभेच्छा दिल्या. [ads id="ads1"]
तसेच विविध वेशभूषेत आलेले विद्यार्थ्यांचे कौतुक केले.. यानंतर रॅली शाळेपासून तर पंचमुखी हनुमान नगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक तेथून दत्त मंदिर रोड, पाराचा गणपती तिथून गांधी चौक ते अफुगल्ली या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत शिवाजी महाराज, माता जिजाऊ, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या थोर महापुरुषांच्या जिवंत प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या. [ads id="ads2"]
या प्रतिमा इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या. याप्रसंगी संपूर्ण परिसर वंदे मातरम व भारत माता की जय घोषाने दुमदुमला. संपूर्ण रावेर शहरातून या रॅलीचे सर्व नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी भारतातील सर्व प्रकारच्या विविध वेशभूषा धारण केल्या होत्या त्यामुळे विविधतेत एकतेचे दर्शन घडत होते आणि हा संपूर्ण देखावा समस्त रावेर शहरवासी यांचे लक्ष वेधून घेत होते या रॅलीत जवळपास स्वामी स्कूलचे चौदाशे ते पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
नंतर या रॅलीचे विसर्जन पुन्हा स्वामी शाळेत करण्यात आले. प्रसंगी रॅलीत सहभागी जूनियर कॉलेज व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी ७५ चा आकडा तयार करून उपस्थितांचे लक्ष सुद्धा वेधले होते.या रॅलीच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


