रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील पत्राच्या शेड मध्ये एकाने घेतला गळफास
रावेर शहरातील स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालयाजवळ (Raver Rural Hospital) अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलिस (Raver Police) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे, रावेर शहरातील स्टेशन रोड (Station Road,Raver) वर ग्रामीण रुग्णालयाजवळ रोड लाच लागून असलेल्या गॅरेज दुकानाच्या पत्राच्या शेडमध्ये रात्री अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणारा व्यक्ती हा निवस्त्र अवस्थेत होता.


