आर्थिक विवंचनेतून यावल तालुक्यातील बामणोद येथील दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 आर्थिक विवंचनेतून यावल तालुक्यातील बामणोद येथील दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

मागील १० वर्षांपासून आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बामणोद ता.यावल (Bamnod Taluka Yawal) येथील शेतकरी दाम्पत्याने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

  सोमवारी दिनांक २९ ऑगस्ट रोजी भुसावळ येथील तापीच्या पुलावर दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. वसंत वासुदेव नेमाडे ( वय-६३ ), मालतीबाई वसंत नेमाडे ( वय-५५ ) अशी दोघांची नावे आहेत. [ads id="ads1"] 

  ते रविवारी दुपारी बामणोद येथील राहत्या घरापासून दुचाकीने बाहेर पडले होते.सोमवारी ( दि. २९ ऑगस्ट) सकाळी तापी नदीपात्रात बेवारस दुचाकी उभी असल्याची माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुचाकीची पाहणी केल्यानंतर भुसावळ शहरातील तापी पात्रातील राहुलनगर घाटाजवळ दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने हे मृतदेह बाहेरकाढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. [ads id="ads2"] 

पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही मृतदेह बामणोद येथील दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले . मालतीबाई या गेल्या १० वर्षांपासून आजारी होत्या. घरची परिस्थिती बेताची असून , या परिवाराने आपली शेती निम्मे हिश्श्याने कसण्यासाठी दिली आहे. तसेच मुलगा आणि सून हे दोन्हीही डॉ .उल्हास पाटील महाविद्यालय व रुग्णालयात रोजंदारीवर काम करतात. शिवाय वसंत नेमाडे यांच्याकडूनही वृद्धापकाळामुळे काम होत नव्हते . परिणामी , त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती . अशा परिस्थितीला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.असा पोलिसांचा कयास आहे.

     भुसावळातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बामणोद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात एक मुलगा, सून,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!