रावेर तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा रसलपुर येथील ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

अनामित
रावेर - आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या अनुदानित आश्रम शाळा रसलपुर येथील विद्यार्थी अचानक तब्येतीत बिघाड झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली रुपेश आत्माराम बारेला (वय ९ वर्षे रा अहिरवाडी रावेर) हा विद्यार्थी तीन वर्षांपासून रसलपूर येथील निवासी आश्रमशाळेत शिक्षण सुरु होते. या वर्षी तो ३ री इयत्तेत शिक्षण घेत होता. [ads id="ads1"] 
आज दिनांक 1 ऑगस्ट 2022 च्या पहाटेच्या सुमारास त्याने अंघोळ केल्यानंतर त्याला काही वेळाने रुपेश ला उलटी व जुलाब सारखे होउ लागले . त्यानंतर त्याची अचानक तब्येत बिघडत गेली,त्यात त्याला अचानक झटके येत असल्याने रुपेश ला तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते अशी माहीती आश्रमशाळेचे अधीक्षक यांनी दिली.[ads id="ads2"]  

रावेर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून जळगाव सामान्य रुग्णालयात नेण्याचे सांगितले. जळगावात आणत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला , अशी माहिती ही अधीक्षक विजय पाटील यांनी दिली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणले असता त्याला तपासून CMO डॉ . प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले . रुपेश बारेला याच्या पश्चात आई वडील , लहान भाऊ असा परिवार आहे.
  रुपेशचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  प्राथमिकदृष्ट्या पाहता या विद्यार्थ्याला फिट आल्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्यातच रुपेशचा मृत्यू झाला, या बाबत रावेर पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!