रावेर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
केह्राळे बु येथे परीसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून या संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी सांगून व निवेदन देऊनही याकडे दोन वर्षांपासून कोणीही लक्ष देत नाहीत.[ads id="ads1"]
त्यामुळेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज दिनांक १५/०८/२०२२ रोजी सर्व देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत असतांनाच केह्राळे बु ,भोकरी, मंगरुळ व जुनोने या चार गावातील नागरीकांच्या रस्त्याच्या समस्यांचे निवेदन दिलेले असतांनाच सुध्दा काहीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे दिपक गोविंदा पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केह्राळे येथे समस्या ग्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.[ads id="ads2"]
दोन वर्षांपासून या रस्त्यांसंबधी सततचा पाठपुरावा करून सुद्धा याकडे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनी बेमुदत आमरण उपोषणाला बसावे लागते आहे अशी नागरिकांकडून बोलले जात आहे.


