धरणगाव प्रतिनिधी
धरणगांव - महाराष्ट्र शासन महसूल विभाग तहसील कार्यालय धरणगाव यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी शाळा - महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील उपशिक्षक तथा बी.एल.ओ.पी.डी.पाटील यांचा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने तहसिलदार नितीन कुमार देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात आले.[ads id="ads1"]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बी.एल.ओ.यांच्या निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजेत्या बी.एल.ओं.ना तहसिलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते, सी.बी.देवराज, शिक्षण विस्तार अधिकारी रवीकिरण बिऱ्हाडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रसंगी निवडणूक शाखा विभागाचे प्रमुख महेंद्र पवार तसेच संपूर्ण टीम, सामाजिक - शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बी.एल.ओ.गोपाल महाजन, समाधान पाटील, रमेश पाटील व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


