धरणगाव प्रतिनिधी
धरणगांव दि. १५ ऑगष्ट, २०२२ सोमवार रोजी स्थानिय सुवर्ण महोत्सवी शाळा - महात्मा फुले हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन समारोह साजरा करण्यात आला....
याप्रसंगी शाळेच्या SSC परीक्षेत शाळेतुन प्रथम आलेला विद्यार्थी चि.रोहन सुनिल गजरे याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासो.ज्ञानेश्वर महाजन होते, प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी मुख्या. एस.डब्ल्यू.पाटील होते व सन्मानणीय संचालक मंडळ, सुकदेव महाजन, माजी उपनगराध्यक्ष देविदास महाजन , नारायण गंगाराम महाजन, माजी शिक्षक व्ही.पी.महाले, गोपाल महाजन , सुभाष महाजन, रविंद्र हरी वाघ, गजानन महाजन, उपस्थित होते.[ads id="ads2"]
सर्वप्रथम शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर शाळेत एस.एस.सी बोर्डाचे शाळेतुन प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी, वर्ग १ली ते वर्ग ९ वी तून प्रथम आलेले विद्यार्थी तसेच ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने निबंध, वकृत्व, चित्रकला, रंगभरण, रांगोळी, राखी मेकिंग स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी विद्यार्थी शुभम महाजन याने शाळेतील ५ विद्यार्थ्यांना, माळी समाजाचे सचिव गोपाल भास्कर माळी यांनी ३ विद्यार्थ्यांना गणवेश भेट दिले. तहसील कार्यालय धरणगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.एल. ओ.निबंध स्पर्धेत शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांचा प्रथम क्रमांक आल्याने संस्थेचे अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एस.डब्ल्यू.पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले असेच शाळेचे नाव मोठे करा असा संदेश देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एम.बी.मोरे, जेष्ठ शिक्षीका पी.आर.सोनवणे, सौ.एम.के.कापडणे, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्या.अतुल सूर्यवंशी, शाळेतील सर्व शिक्षक बंधु - भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख - एस.एन. कोळी तर आभार एच.डी. माळी यांनी मानले.


