निंबोल प्रतिनिधि-विनोद कोळी
निंबोल ता.रावेर दिनांक 15 आगस्ट 2022 रोजी निंबोल ग्रामपंचायत येथे नुकताच ध्वजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात निंबोल च्या सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते पार पडला.ग्रामसेवक MD पाटील ग्रामपंचायत सदस्य,आणि गावकरी यांची उपस्थीती मोठ्या प्रमाणावर होती.त्यानंतर निंबोल येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि गावात रात्रं दिवस सेवा बजावनारे हसकर परिवारातील,सूभास हंसकर आणि त्यांची पत्नी,सुमित्रा हंसकर.यांचे स्वागत शाल आणि पुष्प हार घालून सरपंच वंदना पाटील यांनी केले.[ads id="ads1"]
त्यानंतर ग्रामपंचायत पासुन ते जि.प मराठी शाळेपर्यंत,भारत माता की जय अशा अनेक घोषणा देत शाळेतील मुलांची रली काढण्यात आली.आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळायला 75 वर्ष पूर्ण झाली.75 व्या स्वातंत्र्य महोत्सवा निमीत्त मराठी शाळेत सेवा समर्पण बहूउद्देशिय संस्था निंबोल यांच्या तर्फे 1ली ते 4 थी वर्गाला स्कूल बैग वाटप करण्यात आली.[ads id="ads2"]
तसेच विनोद दुलबा पाटील यांनी सुद्धा शाळेतील मुलांना वही,पेन वाटपाचा कार्यकम पार पाडला.नंतर नितीन पाटील यांच्या कडून शाळेतील मुलांना आणि जमलेल्या सगळ्या लोकांना चहा, नाष्टा चा स्वाद घेतला.उपस्थीत मान्यवर,सरपंच,वंदना पाटील.ग्रामसेवक,MD पाटील,ग्रामपंचायत सदस्य. प्रहार दिव्यांग तालुका प्रमुख,विनोद कोळी. सेवा समर्पन संस्था, सदस्य निंबोल.आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, तसेच गावकरी खुप मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.


