रावेर तालुक्यातील पत्रकारांची स्नेहविचार सभा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

रावेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कृषीतंत्र विद्यालय निंभोरा बु, येथे स्नेहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथे दिनांक २८/०८/२०२२ रोजी सकाळी ११.२० वाजता कृषी तंत्र विद्यालय निंभोरा बु येथे ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी पत्रकारिता करीत असतांना येणाऱ्या अडचणी व त्याचा होणारा परिणाम पत्रकारिता चा अनुभव याकरिता स्नेह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या स्नेह विचार सभेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजीव दादा बोरसे हे होते.[ads id="ads2"] 

   यावेळी दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार अनिल आसेकर यांनी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी यावर फार मोलाचे मार्गदर्शन केले रावेर तालुक्यात ग्रामीण भागात पत्रकारांची भक्कम संघटना तयार करावे असे त्यांनी सांगितले अध्यक्षीय भाषणात राजीव दादा बोरसे यांनी संघटना मजबूत झाली तर पत्रकारांवर होणारे हल्ले थाबतील संघटनेचे महत्व त्यांनी उदाहरण देऊन पटवून सांगितले.

हेही वाचा :- विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना 

हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?

हेही वाचा : सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई

 या स्नेह विचार सभेला विनोद कोळी(शिवाभाऊ), राजीव बोरसे,प्रमोद कोंडे, ज्ञानेश्वर महाजन,अनिल आसेकर, प्रभाकर महाजन, विनायक जहूरे,संजय पाटील, विजय अवसरमल, इक्बाल पिंजारी, आकाश भालेराव, गणेश सेठी, प्रशांत पाटील, चंद्रकांत वैदकर, राहूल जैन,सागर तायडे, दस्तगीर खाटीक, संकेत पाटील, श्रीराम पाटील, दिलीप सोनवणे व असंख्य पत्रकार मित्र उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय अवसरमल यांनी केले तर आभार विनायक जहूरे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!