रावेर (प्रतिनिधी) रावेर येथे आज दिनांक २८ऑगस्ट रविवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कांताई नेत्रालयाच्या वतीने ४० रुग्णाची तपासणी करुण १० रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.[ads id="ads1"]
कांताई नेत्रालयचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी .शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक जकी अहमद मो. अयाज शेख यांनी ४० शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी १० रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला पाठविण्यात आले.[ads id="ads2"]
कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पत्रकार पत्रकार सुनिल चौधरी, बबलुशेठ नगरीया उपास्थित होते.
हेही वाचा :- विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना
हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?
हेही वाचा : सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई
कार्यक्रम यशस्वीतेसाठी (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन, पॅरा लिगल व्हॅलेंटीयर राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील , चालक विनोद पाटील, आदिनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने नेत्र तपासणी लाभार्थी व नातेवाईक उपस्थित होते.