मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णाड १३२ केव्ही येथून दुई,कर्की/कोठा येथे उच्च दाब वाहिनी ३३ केव्ही पुरवठा करण्याकरता सुरू असलेल्या कामांमध्ये विद्युत खांब व विद्युत तारांच्या अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला झोपेचे सोंग घेऊन पाठीशी घालणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे सचिन पाटील, श्याम दांडगे प्रफुल पाटील, गणेश दुट्टे ,अभिषेक पाटील , मधूकर भोई,श्रीराम भोई, मंगेश कोळी गजानन पाटील,[ads id="ads2"] निखिल पाटील दिलीप , पाटील ,दिलीप कांडेलकर,राहुल वाघ , योगेश परीसकर ,मुकेश झाल्टे,प्रेम कोळी,विशाल कांडेलकर,मयूर यमनरे ,पप्पू संदनशीव त्यांची आंदोलनाला उपस्थिती होती





