" अजगर साप मारून जाळ्या प्रकरणी वन गुन्हा दाखल "

अनामित

 सांगली :-  अजगर साप मारून जाळ्या प्रकरणी रत्नागिरी वन विभागकडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,  सांगली येथील पत्रकार, आणि प्राणीमित्र अँड बसवराज होसगौडर यांना आपल्या सहकारी प्राणीमित्राकडून गुप्त माहिती मिळाली की, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील, तिसंगी या गावातील संशयित व्यक्ती यांनी अजगर साप मारून सोशल मीडियावर वायरल केली होती. या बाबत अँड बसवराज होसगौडर यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित सांगली वन विभागातील सहाय्यक वनरक्षक डॉ. अजित साजणे यांना संपर्क करून रत्नागिरी वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक सचिन निलख यांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना संपर्क करून सदर घटनेबद्दल माहिती दिली. मिळालेल्या माहिती आधारे  मौजे. तिसंगी ( निकमवाडी ) ता. खेड, जि. रत्नागिरी येथील संशयीत आरोपी महेश राजाराम निकम यांचे राहते घरी जावून चौकशी केली असता , संशयीत आरोपी यांनी सदरील गुन्हा १ महिन्यापूर्वी केला असलेचे कबुल केले व त्यास घराच्या मागील बाजूस शेत परडयामध्ये कुदळ व फावडयाच्या सहाय्याने खड्डा करून पुरून ठेवले होते. सदर ठिकाणचे पंचा समक्ष सविस्तर पंचनामा करून संशयित आरोपी महेश निकम यांच्या विरुद्ध दि. २३/०८/२०२२ रोजी वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम  ९, ३९(२), व ५१ अन्वये प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक ०२/२०२२, वन गुन्हा दाखल करणेत आला आहे .सदर गुन्ह्यामध्ये आरोपी यांचेकडून मृत अजगर या वन्यप्राण्यांचे सडलेल्या अवस्थेतील मासाचे तुकडे- 02 किलोग्रॅम , कामेरू - 01 , फावडे - 01 , व कुदळ- 01 जप्त करणेत आले आहे.  सदरची कार्यवाही मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी ( चिपळूण ) श्री. दिपक खाडे, मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी दापोली श्री.वैभव बोराटे, वनपाल खेड श्री.सु.आ.उपरे, वनरक्षक आंबवली, श्रीम. प्रियंका कदम , वनरक्षक तळे , श्री. परमेश्वर डोईफोडे, वनरक्षक खवटी श्री. रानबा बांबगेकर , वनरक्षक काडवली श्री. अशोक ढाकणे यांनी कार्यवाही पार पाडली. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी दापोली श्री. वैभव बोराटे यांनी करत आहेत. नागरीकांनी आपल्या आजुबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्यास जवळच्या वनविभागास कळवावे. माहिती देणारेचे नांव गोपनीय ठेवून, कारवाई करण्यात येईल. असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!